बिल गेट्स यांनी 48 वर्षांपूर्वीचा बायोडाटा केला शेअर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मायक्रोसॉफ्टचे सीईओ बिल गेट्स हे जगातील चौथ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रत्येकाला उत्सुकता असते. नुकताच बिल गेट्स यांनी त्यांचा 48 वर्षांपूर्वीचा बायोडाटा सोशल मीडियावर शेअर केला आहे. 124.1 अब्ज डॉलर एवढी संपत्ती असलेल्या बिल गेट्स यांनी बायोडाटा शेअर करून नोकरी शोधणाऱयांसाठी एक खास संदेश दिला आहे.

लिंक्डइन या सोशल नेटवार्ंकग साईटवर बायोडाटा शेअर करत बिल गेट्स यांनी लिहिले की, ‘तुम्ही नुकतेच पदवीधर असाल किंवा कॉलेजमधून बाहेर पडलेले असाल, मला खात्री आहे की, तुमचा बायोडाटा 48 वर्षांच्या तुलनेत खूपच चांगला दिसत असेल.

बिल गेट्स यांनी शेअर केलेला त्यांच्या या बायोडाटामध्ये  सिस्टीम स्ट्रक्चर, डेटाबेस मॅनेजमेंट, कॉम्प्युटर ग्राफिक्स असे अनेक कोर्सेस त्यांनी केल्याचे नमूद केले आहे. अनेक प्रोग्रामिंग भाषांमध्ये त्यांचे प्रावीण्य दिसून येतंय.   बायोडाटामध्ये पूर्वींच्या अनुभवांचाही उल्लेख  आहे.