हात गमावल्यावर पायाने लिहिला पेपर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आपले ध्येय पक्के असेल तर मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर तुम्हाला कुणी अडवू शकत नाही. बिहारच्या नंदलालने हेच दाखवून दिले आहे. नंदलालला दोन हात नाहीत, पण तरीही तो पायाने परीक्षा देत आहे. त्याचा फोटो व्हायरल झाला आहे. नंदलालला भविष्यात आयएएस व्हायचे आहे. आयएएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून तो पायांनी नवीन भाग्यरेषा लिहीत आहे.

मुंगेर जिह्यातील हवेली खरगपूर नगर भागात राहणाऱया नंदलालचे एका दुर्घटनेत दोन हात गेले. पण तरी त्याचा प्रवास थांबला नाही. नंदलालच्या आजोबांनी त्याला धीर दिला आणि पायाने लिहायला शिकवले. नंदलाल सध्या मुंगरेच्या आरएस कॉलेजमध्ये बीएची परीक्षा देत आहे.