
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी विधानसभेला संबोधित करताना भाजपवर निशाणा साधला. अमिताभ बच्चन यांच्या दीवार चित्रपटातील डायलॉगचा आधार घेत त्यांनी भाजपला चांगलेच फटकारले. भाजपकडे ईडी, इन्कमटॅक्स, सीबीआय आहे. मात्र, दिल्लीतील जनता म्हणते आमच्याकडे आमचा मुलगा अरविंद केजरीवाल आहे.
दिल्लीमध्ये चर्चा आहे की, दिल्लीत पुढील विधानसभा निवडणुका होणार नाहीत. दिल्लीला केंद्रशासित प्रदेश बनवण्याची योजना आखण्यात येत आहे. मात्र, ते केवढी मोठी चूक करत आहेत, या गुन्ह्यासाठी जनता त्यांना माफ करणार नाही. केजरीवाल यांचा द्वेश करता करता ते आता देशाचाच द्वेश करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. भाजपवाले नेहमी निधी नसल्याचे कारणे देतात. आम्ही सर्व संस्थाना निधी दिले आहेत. आता एमसीडी केंद्राच्या अखत्यारीत आहे. त्यामुळे आता त्यासाठी केंद्राकडून निधी यायला हवा. आतापर्यंत कर्मचाऱ्यांना वेतनही मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
अमिताभ बच्चन यांचा एक चित्रपट होता दीवार. त्यात अमिताभ यांचा एक डायलॉग आहे. माध्याकडे धन-दौलत, गाडी बंगला आहे. त्यावर शशी कपून उत्तर देतात माझ्याजवळ आई आहे. त्याप्रमाणे आज भाजपवाले धमकी देत आहेत, आणच्याकडे ईडी, इन्कमटॅक्स, सीबीआय आहे. त्याला दिल्लीतील जनता उत्तर देत आहे, आमच्याकडे आमचा मुलगा अरविंद केजरीवाल आहे.
मनीष सिसोदिया यांना ऑगस्टमध्ये अटक करण्यात येईल, अशी चर्चा आहे. हा माणूस चोर दिसतो काय, असा सवालही त्यांनी केला. भाजपशासित 19 राज्ये एका बाजूला आहे आणि दिल्ली एका बाजूला आहे. ज्या आमदारांना अटक केली किंवा कारवाई झाली आहे. त्या प्रकरणात न्यायालयाने भाजपला फटकारल्याचेही त्यांनी सांगितले.
भाजपवाले मनमानी करत दबाव टाकत आहेत. इमानदार असलेल्या सत्येंद्र जैन यांना अटक करण्यात आली. मात्र, त्यांचा भ्रष्टाचार त्यांना सिद्ध करता आलेला नाही. दिल्ली हे एकमेव असे राज्य आहे, जिथे गरीब असो वा श्रीमंत त्यांच्यावर उपचार मोफत करण्यात येतात. आता अशी चर्चा आहे की, मनीष सिसोदिया यांनी ऑगस्टमध्ये अटक करण्यात येणार, त्यांनी 18 लाख विद्यार्थ्यांचे भविष्य घडवले आहे, अशा व्यक्तीला ते अठक करणार आहेत. आपच्या एका कार्यकर्त्यांची 10 तास ईडीने चौकशी केली. अशा परिस्थितीत पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तुरुंगात जाण्यास तयार राहावे. त्यांनी कितीही भीती दाखवली तरी घाबरण्याची काहीही गरज नाही. आपण स्वतः 15 दिवस तुरुंगात काढले आहेत. काहीही त्रास होत नाही, असे त्यांनी सांगितले.
भाजपने सर्वांना घाबरवत, दबाव टाकत सर्व विरोधकांना गप्प केले आहे. मात्र, फक्त ते आपला काहीच करू शकले नाहीत. आपला त्यांचे वरिष्ठ नेतेही घाबरतात. त्यामुळे त्यांना न घाबरता आपला संघर्ष सुरुच ठेवा, असेही केजरीवाल यांनी सांगितले.




























































