
तूरडाळ, मसूरडाळ, मुगडाळ, चवळी, वाटाणे, चणे अशा विविध प्रकारच्या डाळी व कडधान्यांमधून वसई येथील एका कलाकाराने विठूमाऊलीचे मनमोहक चित्र साकारले आहे. वसई तालुक्यातील भाताणे येथील कौशिक दिलीप जाधव यांनी ही कलाकृती साकारली आहे. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही विठूरायाची कलाकृती साकारली आहे.

कौशिक जाधव यांनी ही कलाकृती अवघ्या 20 मिनिटांत पूर्ण केली. त्यासाठी त्यांनी तूरडाळ, मसूरडाळ, मुगडाळ, चवळी, वाटाने, चणे या डाळी व कडधान्यांचा वापर केला आहे. देव या सृष्टीच्या चरा चरा मध्ये आहे, हे कौशिक जाधव यांच्या कलाकृतीमधून दिसून येत आहे. चित्रकार कौशिक जाधव यांनी तांत्रिक उपकरणातून, पेन पट्टी पेन्सिलच्या साह्याने यापूर्वी देखील विठूमाऊलीचे रूप साकारले होते. तसेच त्यांनी पानांमधून देखील 12 वेगवेगळ्या प्रकारे विठू माऊलीचे रूप साकारले आहे.





























































