
रस्त्याने पायी चाललेल्या तरूणाचा पाठलाग करून दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्याकडील मोबाइल, चांदीचे ब्रेसलेट असा मिळून 22 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना शनिवारी रात्री अकराच्या सुमारास साडेसतरानळी परिसरात घडली आहे. सागर तोटरे (वय 22, रा. हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
सागर शनिवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कामावरून सुटल्यानंतर पायी घरी जात होता. त्यावेही अॅमनोरा पार्क मेन रस्त्यावरील बी मार्ट जवळ आल्यानंतर दुचाकीस्वार चौघा चोरट्यांनी त्याला अडविले. धमकावून त्याच्याकडील मोबाइल, चांदीचे बे्रसलेट असा 22 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सागर पोमण तपास करीत आहेत.
भरदिवसा घरफोडी; 3 लाखांचा ऐवज चोरला
भरदिवसा बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाखांचा ऐवज चोरून नेला. ही घटना 10 जुलैला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास हडपसरमधील गणेशनगर परिसरातील इंद्रिायणी सोसायटीत घडली. विश्वजीत कांबळे (वय 30) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
हडपसरमधील इंद्रायणी सोसायटीत विश्वजीत राहण्यास आहेत. ते रविवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घराला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या घराचे कुलूप तोडून 2 लाख 80 हजाराचे दागिने आणि रोकड असा 3 लाख 4 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. विश्वजीत दुपारी घरी परत आले असता त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले.





























































