
मुंबईत दिवसभर सुरू असलेल्या पावसाच्या जोरदार सरींमुळे पवई येथे संरक्षण भिंत कोसळली. सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून सात घरे रिकामी करण्यात आली असून त्यांचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे.
मुंबईत टेकड्यांखाली दाटीवाटीने वसलेली अनेक घरे असून अतिवृष्टीमुळे काही वेळा दरडी कोसळण्याच्या घटना घडतात. मात्र, दरडी कोसळून काही नुकसान होऊ नये, यासाठी संरक्षक भिंतीही बांधण्यात आलेल्या आहेत. पवई येथे बुधवारी सकाळी हिरानंदानी रुग्णालयाच्या मागे, हरीओमनगरला सकाळी 9 च्या सुमाराला संरक्षक भिंत कोसळली. यात कोणी जखमी झाले नाही. खबरदारीचा उपाय म्हणून आजूबाजूची 7 घरे रिकामी करून त्यांच्या राहण्याची सुविधा महापालिकेच्या तिरदांस शाळा आणि गुरुद्वारामध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.






















































