रुपया पुन्हा लुडकला; डॉलर झाला 79.88 रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी चलन रुपयाने शुक्रवारी पुन्हा एकदा अमेरिकन डॉलरपुढे विक्रमी गटांगळी खाल्ली. रुपया कमकुवत झाल्यामुळे एका डॉलरची किंमत 79.88 रुपयांवर पोहोचली आहे. सलग सहा दिवस रुपयाच्या मूल्यामध्ये मोठी घसरण झाल्याने अर्थतज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. पुढील आठवडय़ात रुपया आणखी दुबळा होईल व तो ऐंशीची निच्चांकी पातळी पार करेल, असा अंदाज अर्थतज्ञांनी वर्तवला आहे. सध्या डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ऐंशीच्या पातळीवर गेल्याने कच्च्या तेलापासून इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची आयात, परदेशी शिक्षण, परदेशी प्रवास महाग होण्याबरोबरच देशातील महागाई आणखी आक्राळविक्राळ रूप धारण करेल, असे अर्थतज्ञांनी म्हटले आहे.