
देवगड शहरात 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या देवगडच्या आठवडी बाजारात मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांकडे आढळून येत आहेत. त्यामुळे नगरपंचायतीच्या पथकाने कारवाई करत सुमारे तीन हजार आठशे रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईमुळे प्लॅस्टिक पिशव्या वापरणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
आठवडी बाजारामध्ये अचानक राबवलेल्या मोहिमेमुळे अनेक व्यापार्यांची तारांबळ उडाली. अनेक व्यापाऱ्यांकडे 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्या आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करून दंड वसूल करण्यात आला. अचानक राबवण्यात आलेल्या मोहिमेमुळे व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली असून येणाऱ्या ग्राहकांना पिशवी मिळत असल्यामुळे ग्राहकांचा हिरमोड झाला. या मोहिमेत ए सर्व स्तरातून कौतुकही होत आहे. ही मोहीम शहरातील विविध भागांमध्ये राबवणार असल्याचे सांगण्यात आले.
महाराष्ट्र राज्यात यापूर्वी अमलबजावणी सुरू असून प्लॅस्टिक बंदीचे काटेकोर अंमलबजावणी होण्यासाठी नगर पंचायतीकडून पथक तैनात केले जाणार आहे. देवगड शहरात एकल वापर प्लॅस्टिक बंदीबाबत कारवाई होणार आहे. त्यामुळे नागरिकांसह व्यापारी, विक्रेते यांनी 75 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या व इतर बंदी असलेले साहित्य बाळगू नये, असे आवाहन त्यांनी केले आहे.























































