पी.व्ही. सिंधूने रचला इतिहास, सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात मारली बाजी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

डबल ऑलिम्पिक पदकविजेती हिंदुस्थानी ‘शटल क्वीन’ पी. व्ही. सिंधूने सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात चीनच्या वांग झी यीचा पराभव करत स्पर्धेत बाजी मारली आहे. तिने 21-9, 11-21, 21-15 असे दोन सेट जिंकत वांगचा पराभव केला.

सिंगापूर ओपनच्या सेमी फायनलमध्ये जपानच्या साईना कावाकामीचा सिंधूने 21-15, 21-7 अशा सरळ सेटमध्ये पराभव केला होता. यावर्षी सिंधूने सयेद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आणि स्विस ओपन अशी दोन सुपर 300 टायटल जिंकली आहेत. त्यानंतर आता सिंगापूर ओपनचं तिसरं पदक आपल्या नावावर केलं आहे.