
हिंदुस्थानविरुद्धच्या तीन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेसाठी सोमवारी 13 सदस्यीय वेस्ट इंडीज संघाची घोषणा झाली. माजी कर्णधार जेसन होल्डरचे या संघात पुनरागमन झाले आहे. बांगलादेशविरुद्ध मायदेशात झालेल्या टी-20 मालिकेत होल्डर खेळला नव्हता.
वेस्ट इंडीजचा एकदिवसीय संघ ः निकोलस पुरन (कर्णधार), शाई होप, शेमार ब्रुक्स, किसी कार्टी, जेसन होल्डर, अकील हुसैन, अल्जारी जोसेफ, ब्रॅण्डन किंग, काइल मायर्स, गुडाकेश मोती, किमो पॉल, रोवमन पॉवेल, जेडन सील्स.
























































