हिंदुस्थानी लष्करी तळांवर चीनचा हल्ल्याचा छुपा कट, एलएसीजवळ मल्टिपल लॉन्च रॉकेट सिस्टमची चाचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पूर्व लडाखमधील सीमावाद सोडवण्यासाठी हिंदुस्थानसोबत चर्चा करणाऱया चीनने प्रत्यक्षात या चर्चेआडून हल्ल्याच्या कुरापती सुरूच ठेवल्या आहेत. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर (एलएसी) आपली स्थिती मजबूत करण्यासाठी चीन सतत धडपडत आहे.

त्याच कुटील हेतूने एलएसीजवळील शिनजियांग परिसरात चीनने अत्याधुनिक मल्टिपल लाँच रॉकेट सिस्टमची (एमएलआरएस) चाचणी नुकतीच केली आहे. उंच पर्वतावर युद्धासाठी तयार केलेल्या या सिस्टमद्वारे हिंदुस्थानी लष्करी तळांवर हल्ला करण्याचा छुपा कट चीनने रचला आहे.

चीनचे सरकारी मीडिया नेटवर्क असलेल्या ‘सीसीटीव्ही’ने हिंदुस्थानच्या सीमेवरील सैन्य कारवायांसंबंधी 33 सेकंदांचा एक व्हिडीओ बुधवारी जारी केला. चीनचे सैन्य पेंगाँग सरोवरावर कब्जा मिळवण्यासाठी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून हल्ल्याचा सराव करीत असल्याचे त्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.