फणसगावमध्ये चोरटयांनी दोन मंदिराच्या दानपेट्या फोडल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

फणसगावमधील दोन मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडून रक्कम चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. दोन्ही मंदिराच्या दानपेट्या पैसे काढून मंदिराच्याच बाजूला टाकून दिल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फणसगावचे ग्रामदैवत श्री रवळनाथ मंदीर व विठ्ठल मंदीर या दोन मंदीरातील दानपेट्या फोडून पैसे चोरून नेल्याचे शनिवारी सकाळी मंदीरात पुजा करण्यासाठी गेलेले पुजारी प्रविण गुरव व चंद्रकांत आडीवरेकर यांच्या निदर्शनास आले. याची माहिती त्यांनी गावातील मानकरी मंडळींना दिली. त्यानंतर विजयदूर्ग पोलीस ठाण्याचे पाटगाव दुरक्षेत्राचे हेड कॉन्टेबल तांबे यांना कळविण्यात आली.

चोरीच्या घटनेबाबत समजल्यानंतर विजयदूर्ग पोलीस ठाण्याचे सह पोलीस निरीक्षक बी.बी. फोर्णे, पोलीस उपनिरीक्षक भालेराव, पोलीस हेड कॉन्टेबल दिपेश तांबे आदींनी घटनास्थळी जात पंचनामा केला. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध्द गुन्हा दाखल केला असून पोलिस उपनिरिक्षक भालेराव अधिक तपास करीतआहेत.