
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी कर्जत विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्ती जाहीर केली आहे.
उपजिल्हा युवा अधिकारी – निखील पाटील (कर्जत विधानसभा). तालुका युवा अधिकारी – प्रथमेश मोरे (कर्जत तालुका). तालुका चिटणीस – अॅड. संपत हडप (कर्जत तालुका). तालुका समन्वयक – अॅड. प्रमोद सुर्वे (कर्जत तालुका). उपतालुका युवा अधिकारी- विश्वनाथ बोराडे (कर्जत तालुका), नितीन निरगुडा (कर्जत तालुका), पंकज म्हसे (कर्जत तालुका), मनोहर देशमुख (कर्जत तालुका), किशोर दळवी (कर्जत तालुका), संतोष मसणे (कर्जत तालुका). तालुका सहचिटणीस – श्याम देशमुख (कर्जत तालुका). तालुका सह समन्वयक – संदीप कोळंबे (कर्जत तालुका), किशोर पोसाटे (कर्जत तालुका), ऋषिकेश सोनावले (कर्जत तालुका) या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यानंतर पदाधिकाऱयाचे काम पाहून कायम करण्यात येईल, अशी माहिती युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
शिवसेनेतून हकालपट्टी
शिवसेना ठाणे ग्रामीण महिला जिल्हा संघटक लता देवराम पाटील यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
ठाणे जिह्यातील पदाधिकारी जाहीर
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने ठाणे जिह्यातील शिवसेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
जिल्हाप्रमुख- सदानंद थरवळ (विधानसभा-डोंबिवली, कल्याण ग्रामीण, मुंब्रा-कळवा), चंद्रकांत बोडारे (विधानसभा-अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व), सहसंपर्कप्रमुख – रमेश जाधव (कल्याण पूर्व), शहरप्रमुख – विवेक खामकर (डोंबिवली शहर), शरद पाटील (कल्याण पूर्व).



























































