
देशात महागाईने कहर केला असतानाच पुढील आठवडय़ात कर्जे आणखी महाग होणार आहेत. रिझर्व्ह बँकेच्या पॅनेल बैठकीत प्रमुख रेपो दरात 0.35 टक्क्यांची वाढ केली जाण्याची शक्यता आहे.
रिझर्व्ह बँकेने गेल्या महिन्यात रेपो दरात 50 बेसिस पॉइंट म्हणजेच 0.50 टक्क्यांची वाढ केली होती. त्यामुळे सध्या रेपो दर 4.90 टक्क्यांवर पोहोचला आहे. त्यात पुढील आठवडय़ात आणखी 35 बेसिस पॉइंटची वाढ केली जाण्याची शक्यता आहे. 5 ऑगस्ट रोजी जाहीर होणाऱया चलनविषयक धोरण समितीच्या ठरावापूर्वी बोफा सिक्युरिटीजने प्रसिद्ध केलेल्या अहवालात हा अंदाज वर्तवला आहे.




























































