मुंबईत कोरोनाचे 290 रुग्ण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबईत आज दिवसभरात कोरोनाचे 290 रुग्ण सापडले तर एकाचा मृत्यू झाला. त्यापैकी 267 जणांना कोणतीही लक्षणे नव्हती. 23 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले तर 5 जणांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून देण्यात आले.

दिवसभरात 298 जण कोरोनामुक्त झाले तर सक्रीय रुग्णांची संख्या 1 हजार 797 वर पोहोचली आहे. दरम्यान, राज्यात 1 हजार 997 रुग्ण सापडले आहेत तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे. दिवसभरात 2 हजार 470 जण कोरोनामुक्त झाले असून सक्रीय रुग्णांची संख्या 13 हजार 186 वर पोहोचली आहे.

बीए व्हेरिएंटचे आणखी 36 रुग्ण

राज्यात कोरोनाच्या बीए व्हेरिएंटची संख्या वाढत असून आज बीए-5 चे 4 रुग्ण तर बीए 2.75 चे 32 रुग्ण सापडले, अशी माहिती नीरी संस्थेने दिली. यातील 23 रुग्ण हे नागपूरचे असून 11 यवतमाळ तर 2 वाशिम येथील रुग्ण आहेत. राज्यात आतापर्यंत बीए-4 आणि बीए-5चे रुग्णांची संख्या 196 तर बीए 2.75 च्या रुग्णांची संख्या 120 झाली आहे.