
पश्चिम रेल्वेच्या अंधेरी स्थानकात नवा स्कायवॉक बांधला गेला असून तो सोमवारपासून प्रवाशांसाठी खुला करण्यात आला आहे. हा स्कायवॉक सहा मीटर रुंद असून 98 मीटर लांबीला आहे. हा नवीन स्कायवॉक दक्षिण दिशेच्या नवीन पादचारी पुलाला दक्षिण दिशेच्या जुन्या पादचारी पुलाला जोडण्यास मदत करीत आहे. हा स्कायवॉक जुन्या पादचारी पुलावर पश्चिम आणि पूर्वेकडून येणाऱया आणि जाणाऱया प्रवाशांना अतिरिक्त मार्ग उपलब्ध करीत असल्याने पिकअवरमध्ये विनाअडथळा प्रवाशांना मार्गक्रमण करणे सोपे होणार आहे.
या नव्या स्कायवॉकला बांधण्यासाठी 4.50 कोटी रुपयांचा खर्च आला आहे. याशिवाय दादर, खार, नायगाव, वसई रोड आणि नालासोपारा स्थानकांवर आणखीन पाच पादचारी पूल यंदाच्या आर्थिक वर्षात उभारण्याची योजना असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी स्पष्ट केले.

























































