
युवासेना पंढरपूर विभागाच्या वतीने युवासेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे, युवासेना उपजिल्हाप्रमुख सोनू पराडे यांच्यावतीने संगम येथे ईडीचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी युवासेना सहसचिव स्वप्निल वाघमारे शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख पूनमताई अभंगराव, युवती सेना जिल्हाप्रमुख साक्षी भिसे उपस्थित होते.
यावेळी गणेश इंगळे म्हणाले की सध्याच्या घडीला महाराष्ट्रात भाजप सुड बुध्दीने शिवसेनेच्या विरोधात काम करत आहे. सध्या भाजपने ईडीला हाताशी धरून शिवसेनेचे आमदार व खासदार यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे काम सुरु केले आहे. यावरून असे जाणवत आहे की ईडी सध्या ईडी आहे की भाजपची घरगडी आहे हेच कळायला मार्ग नाही.































































