कोस्टल रोडच्या ‘मावळा’चा खोदकामात जागतिक विक्रम, एका महिन्यात 456.724 मीटर बोगदा खोदला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून आणि पालिकेच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱया महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पातील ‘मावळा’ टनेल बोअरिंग मशीनने बोगद्याच्या खोदकामात जागतिक विक्रम केला आहे. प्रकल्पातील दुसऱया बोगद्याच्या कामात 456.724 मीटर खोदकाम एका महिन्यात तर 140.168 मीटर बोगदा एका आठवडय़ात खोदण्याची कामगिरी केली आहे. हा विक्रम याआधी तुर्कीच्या एका रेल्वे प्रोजेक्टमध्ये अनुक्रमे 455.4 मीटर आणि 133.2 मीटर इतका नोंदवला गेला होता.

मुंबईची वाहतूककोंडी फोडण्यासाठी प्रियदर्शिनी पार्क ते वरळी सी लिंकदरम्यान 10.58 किमीचा कोस्टल रोड बांधण्यात येत असून या कामात दोन महाकाय बोगदे बांधण्यात येत आहेत. चार मजली इमारतीची उंची असणाऱया महाकाय ’मावळा’ टनेल बोअरिंग मशीनने 2.072 किलोमीटरचे हे बोगदे खोदण्यात येत आहेत. यातील पहिला बोगदा खोदण्याचा टप्पा 10 जानेवारी 2022 रोजी पूर्ण झाला आहे. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्पाचे काम वेगाने प्रगतिपथावर आहे.

नोव्हेंबर 2023 पर्यंत प्रकल्प मुंबईकरांच्या सेवेत
सद्यस्थितीत प्रकल्पाचे एकूण 59 टक्के काम पूर्ण झाले असून प्रकल्पाचे पूर्ण काम नोव्हेंबर 2023 पर्यंत पूर्ण करून मुंबईकरांच्या सेवेत दाखल करण्याचे नियोजन असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.
या प्रकल्पातील बोगदे ‘न्यू ऑस्ट्रियन टनेलिंग’ तंत्रज्ञानाने बनवण्यात येत असून आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास प्रवासी आणि वाहने सुरक्षितरीत्या बाहेर काढता येणार आहेत. कंट्रोल रूम, स्वयंचलित नियंत्रण आणि पोलीस यासारख्या सुरक्षा यंत्रणांशी हे बोगदे जोडलेले असतील.

संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना विभाग क्रमांक 10 दादर, प्रभादेवी, माहीम येथील शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मंगळवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’ निवासस्थानी भेट घेत आम्ही शिवसेनेसोबतच असल्याची ग्वाही दिली.