जलसंधारणच्या कार्यकारी अभियंत्याला लाचप्रकरणात अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कामाचे बिल काढून ते वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्यासाठी दोन टक्केप्रमाणे 92 हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी मृदा व जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहे.

सतीश पंचाप्पा लब्बा (वय 48, मूळ रा. सिद्धेश्वर पेठ, सोलापूर, सध्या रा. सदरबझार, सातारा) असे त्याचे नाव आहे. तक्रारदाराने मृदा व जलसंधारण विभागाचे काम केले होते. या कामाचे बिल काढण्यासाठी लब्बा याने त्यांना दोन टक्केप्रमाणे 92 हजार रुपयांची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्या अर्जावरून पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये लब्बा याने 92 हजार रुपयांची मागणी केल्याचे समोर आले. त्यामुळे मृदू व जलसंधारण विभागात सापळा रचण्यात आला. त्यामध्ये लब्बाला 92 हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडण्यात आले. पोलीस निरीक्षक सचिन राऊत, हवालदार राजे, काटकर, येवले व भोसले यांनी ही कारवाई केली.