वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुताना ‘या’ टिप्सचा वापर करून पाहा, होतील अनोखे फायदे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खरे तर पावसाळ्यात कपडे धुणे, वाळवणे आणि धुळीपासून मुक्त ठेवणे हे खूप अवघड काम असते. यावेळी हवामानातील आर्द्रतेमुळे कपडे लवकर सुकत नाहीत. त्याचबरोबर सूर्यप्रकाशाअभावी कपड्यांनाही दुर्गंधी येऊ लागते. अशा वेळी वॉशिंग मशिनमध्ये बर्फ टाकून कपडे धुतल्याने हे सर्व समस्यांपासून सुटका होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया वॉशिंग मशिनमध्ये बर्फ वापरण्याचे काही अनोखे फायदे.

कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर बहुतांश घरांमध्ये सर्रासपणे केला जातो. मशीमध्ये कपडे धुतल्याने शारीरिक कष्ट आणि वेळही वाचो. त्यामुळे काही वेळातच कपडे स्वच्छ धुतले जातात. सहसा वॉशिंग मशीनमध्ये कपडे धुण्यासाठी फक्त पाणी आणि डिटर्जंट वापरले जाते, पण तुम्हाला माहित आहे का, कपडे धुताना बर्फ टाकणेदेखील खूप फायदेशीर ठरू शकते.

मशीन स्वच्छ करा
अनेक वेळा अस्वच्छ वॉशिंग मशीनमुळे कपड्यांना दुर्गंधी येऊ लागते. त्यामुळे वॉशिंग मशिनचे रबर आणि गॅस्केट पूर्णपणे स्वच्छ करा. त्यानंतर वॉशिंग मशीनचे टब स्वच्छ करण्यासाठी मशीनमध्ये पाणी भरा. 3 चमचे बेकिंग सोड्यामध्ये अर्धा लिटर व्हिनेगर मिसळा आणि मशीन सुरू करा त्यानंतर मशीन स्वच्छ पाण्याने धुवा. यामुळे यंत्रातील सर्व घाण साफ होईल.

ड्रायरमध्ये बर्फ ठेवा
वॉशिंग मशिनमध्ये कपडे वाळवल्याने कपडे चुरगळतात. त्यामुळे ड्रायरमध्ये कपडे वाळवताना वॉशिंग मशिनच्या ड्रायरमध्ये थोडेसे बर्फाचे खडे टाकू शकता. बर्फ टाकल्यानंतर ड्रायरमधला बर्फ वितळला की, त्याची वाफ तयार होईल. यामुळे कपडे जास्त चुरगळणार नाहीत. यामुळे वाळलेल्या कपड्यांना इस्त्री करताना त्रासही होणार नाही.

कोरडा टॉवेल वापरा
पावसाळ्यात अनेकदा कपडे लवकर वाळत नाहीत. अशावेळी कोरड्या टॉवेलचा वापर करू शकता. कोरडा टॉवेल कपड्यांचे पाणी शोषून घेतो. यामुळे वॉशिंग मशिनमध्ये कपडे सुकवताना ड्रायरमध्ये कोरडा टॉवेल ओल्या कपड्यांखाली ठेवा. या टॉवेलने कपडे व्यवस्थित सुकतील शिवाय ओले कपडे सुकवताना कोणतीही अडचण येणार नाही.