
राज्यात नवे सरकार स्थापन केल्यानंतर सततच्या दिल्लीवाऱ्या, दौरे, सत्कार समारंभ व बंडखोर आमदारांसोबतच्या बैठका आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीचा ताण यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आजारी पडले आहेत. त्यामुळे त्यांनी सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.
एकनाथ शिंदे यांनी 20 जून रोजी बंड केल्यानंतर गद्दार आमदारांसोबत सुरत, गुवाहाटी मग गोवा दौरा केला. 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर बैठका, जाहीर सभा, विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र दौरा केला. या काळात सहावेळा दिल्ली दौरा करण्याची वेळ आली. मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर सतत ते तणावाखाली आहेत. त्याचा परिणाम प्रकृतीवर झाला असल्याचे सांगण्यात येते.

























































