वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाथर्डी तालुक्यातील माणिकदौण्डी येथील एका आरोपीला वॉरण्ट बजवण्यासाठी गेलेल्या आकाश अशोक चव्हाण व भरत अंगरखे या दोन पोलीस कर्मचाऱ्यावर हल्ला करण्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आकाश चव्हाण व भरत अंगरखे हे दोन पोलीस कर्मचारी माणिकदौण्डी येथे अफजल छोटे खान पठाण याला एका गुन्ह्यातील वॉरण्ट बजवण्यासाठी गेले होते. तेव्हा पठाण हा दुचाकीवरून पळून जाऊ लागला. त्याला रोखण्याचा प्रयत्न चव्हाण व अंगरखे यांनी केला.

तेव्हा पठाण व त्याचे साथीदार आतिक अफजल पठाण,आशीर छोटे खान पठाण, रमीज अकबर पटेल व एका अनोळखी इसमाने या दोघांनाही काठीने मारहाण केली तर चव्हाण यांना जमिनीवरून फरफटत नेले. या घटनेची माहिती कळताच पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथक माणिकदौण्डी येथे गेले व त्यांनी आरोपीचा अनेक ठिकाणी तपास केला मात्र तो पर्यंत सर्व आरोपी फरार झाले होते.