मुंबईत पावसाची दमदार हजेरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना गुरुवारी मध्य रात्रीपासून कोसळणार्या दमदार सरींमुळे मोठा दिलासा मिळाला तर शुक्रवारी दिवसभरही थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

जुलै महिन्यांत पावसाने दमदार हजेरी लावण्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मात्र पावसाने दडी मारली. त्यामुळे उन्ह आणि आद्रर्तेमुळे मुंबईकर उकाड्याने हैराण झाले होते. गुरुवारी मध्यरात्रीपासून पावसाने मुंबई शहर त्याचबरोबर पूर्व आणि पश्चिम उपनगरात दमदार हजेरी लावली. शुक्रवारीही दिवसभरात मुंबईच्या विविध परिसरात अधून मधून जोरदार सरी कोसळल्या. दरम्यान, मुंबई, कोकणासह राज्यभरात येत्या रविवारपासून मान्सून सक्रिय होणार आहे, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.