
राजधानी दिल्लीत मंकीपॉक्सचा संसर्ग वाढतच आहे. शुक्रवारी एम्स रुग्णालयात 12 संशयित रुग्णांचे वैद्यकीय नमुने तपासण्यात आले. त्यातील दोघांना मंकीपॉक्सची लागण झाल्याचे उघडकीस आले. या दोन्ही रुग्णांना एलएनजेपी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याआधी दिल्लीसह केरळ आणि गुजरातमध्ये मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत.

























































