
राज्यात कोरोना ‘बीए’ व्हेरिएंटची चिंता कायम असून एकाच दिवसात 49 रुग्ण आढळले आहेत. यामुळे एकूण रुग्णांची संख्या आता 506 गेली आहे. या व्हेरिएंटमध्ये ‘बीए 4’, ‘बीए 5’ आणि ‘बीए 2.75’ प्रकारच्या रुग्णांचा समावेश असल्याचे राज्य सरकारच्या आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबईत 486 नवे रुग्ण
मुंबईत गेल्या 24 तासांत करण्यात आलेल्या 9541 चाचण्यांमध्ये 486 कोरोनाबाधित आढळले आहेत, तर दोन जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जिल्हानिहाय ‘बीए. 2.75’ रुग्ण
पुणे – 159, नागपूर – 33, यवतमाळ -12, सोलापूर -9, मुंबई -5, अकोला- 6, ठाणे – 3, वाशीम – 2, अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, सांगली – प्रत्येकी 1






























































