मणिपूरमध्ये राजधानी इंफाळसह पाच जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मणिपूरमध्ये धार्मिक हिंसाचार वाढण्याची भीती असल्याने प्रशासनाने राजधानी इंफाळसह पाच जिह्यांतील इंटरनेट सेवा पुढील पाच दिवसांसाठी बंद ठेवली आहे. तसेच विष्णुपूर आणि चुरचांदापूर येथे दोन महिन्यांसाठी कलम 144 लागू करत जमावबंदीचे आदेश दिले आहेत.

विष्णुपूर येथे शनिवारी एका समाजाच्या चार युवकांनी एका गाडीला आग लावल्याने परिसरात तणाव वाढला आहे. सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात असली तरी सोशल मीडियावरून धार्मिक भावना दुखावणारी वक्तव्ये व्हायरल होण्याची भीती आहे. त्यामुळे मोठा हिंसाचार होऊ शकतो. त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाच जिह्यांमधील इंटरनेट सेवा बंद केली आहे.