आझमगडमधून इसिसच्या संशयिताला अटक ; 15 ऑगस्टला बॉम्बस्फोटाचा होता कट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त बॉम्बस्फोटाचा कट रचणाऱ्या एका इसिसच्या संशयिताला उत्तर प्रदेशच्या एटीएसने आझमगडमधून अटक करण्यात आली आहे. सबाउद्दीन आजमी असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याच्याकडून आयईडी बनवण्याचे साहित्य एटीएसने जप्त केले आहे. एटीएसकडून त्याची चौकशी सुरू आहे.

आजमीला अटक करून त्याला एटीएसच्या मुख्यालयात आणण्यात आले आहे. त्याच्या मोबाईल डेटाची तपासणी केली असता इसिसने दहशतवाद आणि जिहादसाठी मुस्लीम युवकांचे ब्रेनवॉश करण्यासाठी सुरू केलेल्या टेलिग्रॅम चॅनेल AL-SAQR MEDIA शी तो संबंधित असल्याचे आढळून आले आहे. तसेच संशयित आरोप एमआयएमचा सदस्य आहे. आजमीला अटक करण्यात उत्तर प्रदेश एटीएसला मोठे यश मिळाले आहे.

बिलाल नावाच्या व्यक्तीशी फेसबुकवर तो संपर्कात होता. त्यात जिहाद, कश्मीर मुद्दा यावर ते चर्चा करत होते. बिलालने मूसा उर्फ खत्ताब कश्मीरी याचा नंबर दिला होता. तो इसिसशी संबधित होता.त्याच्याशीही आजमी संपर्कात होता. कश्मीरचा बदला घेण्यासाठी मूसाने इसिसच्या अबू बकरचा नंबर आजमीला दिला होता. तो सध्या सिरीयामध्ये आहे.

हिंदुस्थानातही इसिससारखे इस्लामिक संघटना बनवण्यासाठी आणि आयईडी बनवण्यासाठीची माहिती घेतली होती. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या सदस्यांना लक्ष्य करण्यासाठी तो योजना आखत असल्याचीही माहिती मिळाली आहे. स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्टला देशात घातपात आणि बॉम्बस्फोट घडवण्याचा त्यांचा तट होता.