ब्रेकिंग न्यूज – नीतीश कुमार बुधवारी घेणार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जदयूने बिहारमध्ये भाजपशी युती तोडल्यानंतर राजकीय घेडामोडींना वेग आला आहे. संध्याकाळी नीतीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यासह राज्यपालांची भेट घेत सत्तास्थापनेचा दावा केला. तसेच 164 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्रही त्यांना दिले. त्यानंतर आता बुधवारी नीतीश कुमार बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. त्याच्यासह तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी माहिती मिळाली आहे. नीतीश कुमार सात पक्षांसह सरकार स्थापन करत आहेत.  नीतीश कुमार आठव्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.