
चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी येथे जहाल विषारी पट्टेरी मण्यार साप आढळून आला. चार फुट लांबीच्या या सापाला सर्पमित्रांनी पकडले. सापाला मुक्त अधिवासात सोडण्यात आले आहे. पट्टेरी मण्यार गडचिरोली जिल्ह्यात सापडल्याचा अनेक नोंदी आहेत. मात्र चंद्रपूरात या सापाच्या नोंदी नाहीत. ब्रम्हपुरी हा तालुका गडचिरोली जिल्हाला लागून आहे. त्यामुळे पुरात हा साप वाहून आल्याची शक्यता आहे. जहाल विषारी साप असला तरी मानवाला दंश केल्याचा नोंदी दोन्ही जिल्ह्यात नसल्यातच आहेत.
ब्रम्हपुरी शहरातील पेठ वॉर्ड येतील विजय अंबादे यांच्या राहत्या घरी चार फूट लांबीचा पट्टेरी मण्यार साप आढळून आला. साप असल्याची माहीती माहिती सर्पमित्र गणेश सातरे, सार्थक मेहर यांना देण्यात आली. सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने सापाला पकडले. सापाला मुक्त अधिवासात सोडण्यात आले आहे. पट्टेरी मण्यार साप ब्रम्हपुरीत आढळल्याचा नोंदी फार कमी आहेत.
कुठे आढळून येतो हा साप
पट्टेरी मण्यार हा साप हिंदुस्थानात प्रामुख्याने पश्चिम बंगाल, आसाम , बिहार व पूर्व महाराष्ट्रातील वैनगंगा नदीकाठच्या भागात आढळून येतो. गडचिरोली जिल्ह्यात हा साप सापडल्याच्या नोंदी आहेत.
चार प्रमुख विषारी सापांमध्ये गणना
मण्यार किंवा मणेर ही हिंदुस्थानात आढळणाऱ्या चार प्रमुख विषारी सापांपैकी एक जात आहे. (इतर विषारी साप- नाग, फुरसे आणि घोणस.) मण्यारच्या काही उपजातीही आहेत. साधा मण्यार अथवा मण्यार, पट्टेरी मण्यार, व काळा मण्यार या तीन जाती हिंदुस्थानात आढळतात.
मण्यारचा दंश झाल्याचा नोंदी फार कमी
मण्यार सापाचे मुख्य खाद्य उंदीर व तत्सम कुरतडणारे प्राणी, पाली व सरडे, इतर छोटे साप व बेडूक आहे. हा साप प्रामुख्याने जंगलात असतो. मात्र खाद्याचा शोधात जंगलालगत असलेल्या वस्तीकडे क्वचित प्रसंगी हा जात असतो. मण्यारने माणसाला दंश केल्याच्या नोंदी फार कमी आहेत.
































































