राजू श्रीवास्तव यांची प्रकृती चिंताजनक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सुप्रसिद्ध विनोदी कलाकार राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अधिकच चिंताजनक बनली आहे. सध्या त्यांचा मेंदू काम करत नसून ते जवळपास ‘ब्रेन डेड’ स्थितीत गेले आहेत, अशी माहिती राजू यांचे मुख्य सल्लागार अजित सक्सेना यांनी गुरुवारी दिली. आता सगळे काही परमेश्वराच्या हातात आहे, असे ते म्हणाले.

राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. मागील आठ दिवसांपासून ते बेशुद्धावस्थेत आहेत. त्यांना हृदयाशी संबंधित समस्याही आहेत. त्यामुळे आम्ही सगळेच चिंतेत असून परमेश्वरापुढे प्रार्थना करण्याचाच पर्याय उरला आहे, असे अजित सक्सेना यांनी राजू यांच्या प्रकृतीबाबत अपडेट देताना सांगितले. 10 ऑगस्टला जीममध्ये वर्कआऊट करताना राजू यांना हृदयविकाराचा झटका आला, तेव्हापासून ते रुग्णालयात आहेत.