
>> स्वरा सावंत
देशात 2002 साली एक कायदा अस्तित्वात आला – ‘जैविक विविधता कायदा 2002’. या कायद्याला पार्श्वभूमी होती 1992 साली रिओ दि जानेरिओ येथे भरलेल्या कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटीची. प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या गावातल्या जैवविविधतेची ‘नोंदवही’ (पीपल्स बायोडायव्हर्सिटी रजिस्टर – पीबीआर) तयार करावी. या नोंदवहीत गावातल्या वनस्पती-प्राण्यांच्या प्रजाती, लोकजीवन आणि जैवविविधता, महत्त्वाच्या परिसंस्था आणि अधिवास यांची नोंद करणे अपेक्षित आहे. रत्नागिरी जिह्यातील अणसुरे ग्रामपंचायतीने ही नोंदवही तयार केली आणि या ग्रामपंचायतीच्या देवराईत अनेक जुन्या शंभरी पार केलेल्या वृक्षांचा शोध लागला. ही जैवविविधता येणाऱया पिढीला समजावी यासाठी हिंदुस्थानातल्या या पहिल्या संकेतस्थळाची निर्मिती झाली. या निर्मितीप्रक्रियेचा घेतलेला हा आढावा.
माशांची नोंद, पक्षी आणि नकाशा
अणसुरे गाव खाडीकिनाऱयाने वेढलेलं असल्यामुळे माशांची नोंद हा एक महत्त्वाचा भाग होता. त्याकामी आशीष पाटील या उत्साही तरुणाने चांगली मदत केली. त्याच्याकडे चाळीसएक माशांच्या पह्टोंचा संग्रह होता. ते सगळे त्याने दिले आणि त्यांची माहितीही दिली. दर्शन पंगेरकर या मित्राने खेकडय़ांचे पह्टो काढून दिले. आडिवऱयातले सुहास गुर्जर यांनी गावात येऊन मोठय़ा पॅमेऱयाने पक्ष्यांचे पह्टो काढून देण्याचं काम आवडीने घेतलं. रत्नागिरीचे भूगोलाचे अभ्यासक श्रीवल्लभ साठे यांनी त्यांचं ज्ञान वापरून गावाचा अतिशय पद्धतशीर असा नकाशा तयार करून दिला. वनस्पतींच्या नावांची ओळख करून देण्याच्या कामी अनेक तज्ञ व्यक्तींनी स्वयंस्फूर्तीने मदत केली.
राजापूर तालुक्यातील अणसुरे ग्रामपंचायतीने अणसुरे जैवविविधता या नावाच्या लोकजैवविविधता संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. असे संकेतस्थळ विकसित करणारी अणसुरे ग्रामपंचायत देशातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे. परंपरागत ज्ञानाला कायदेशीर संरक्षण मिळावं आणि जैवविविधता संरक्षण-संवर्धनाच्या योजना गाव पातळीवर तयार करता याव्यात या उद्देशाने ही संकल्पना आणली गेली. कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय स्तरावर ‘राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण’, राज्य स्तरावर ‘राज्य जैवविविधता मंडळ’ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीवर ‘जैवविविधता व्यवस्थापन समिती’ अशी त्रिस्तरीय रचना केलेली आहे.
स्थानिक व्यवस्थापन समितीकडे कक्षेतील जैवविविधतेचं जतन आणि संरक्षण करणं तसंच संतुलित वापर आणि जैवविविधतेशी संबंधित सर्व माहिती एकत्रित करण्याची जबाबदारी आहे. हा कायदा आल्यापासून काही गावांमध्ये याची चांगली अंमलबजावणी झाली आहे, तर बहुतांश गावांपर्यंत अजून ही संकल्पना पोहोचलेलीच नाही. या सगळय़ा पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिह्यातल्या अणसुरे, ता. राजापूर या गावाने केलेला ‘लोकजैवविविधता संकेतस्थळ’ हा एक आगळावेगळा प्रयोग विशेष उल्लेखनीय ठरतो. या संकेतस्थळाच्या रूपात लोकजैवविविधता नोंदवही तयार करणारं अणसुरे हे हिंदुस्थानातील पहिलं गाव ठरलं आहे. आजचे युग हे डिजिटल मीडियाचं युग आहे. प्रत्येकाच्या हातात स्मार्टपह्न आहे. आपल्या गावात काय जैवविविधता आहे याची माहिती ऑनलाइन स्वरूपात संकलित करता येईल. ती कायमस्वरूपी जतन होईल आणि कधीही अपडेट करता येईल आणि कोणालाही ती स्मार्टपह्नवरून सहज बघता येईल या उद्देशाने गावाच्या जैवविविधतेची वेबसाइट करायची कल्पना सुचली. ही कल्पना गावचे सरपंच रामचंद्र कणेरी आणि ग्रामविकास अधिकारी राजेंद्रप्रसाद राऊत यांनी मार्गी लावली. तांत्रिक कामाची जबाबदारी ग्राममित्र मंदार परांजपे याने आनंदाने स्वीकारली.
‘लोकजैवविविधता नोंदवही’ म्हणजे नुसती गावातल्या वनस्पती-प्राण्यांच्या प्रजातींची नोंद करत जाणं नव्हे, तर लोकजीवनाचा आणि जैवविविधतेचा संबंध काय आहे याची नोंद करणं इथे महत्त्वाचं आहे. उंडिलापासून कडू तेल काढण्याचा घाणा, पांगाऱयाचं लाकूड तळाशी घालून बांधलेली 60 वर्षांची जुनी विहीर, निवडुंगाचा खत म्हणून केला जाणारा उपयोग, असं स्थानिक ज्ञानाचं संकलन या वेबसाइटवर केलेलं आहे आणि अधिक माहितीसाठी उपयुक्त संदर्भ लिंक्स दिल्या आहेत. एखाद्या झाडाबद्दल मराठी विश्वकोशात अथवा अन्य कुठल्या वेबसाइटवर माहिती असेल तर त्याची लिंक त्या ठिकाणी दिलेली आहे, जेणेकरून वाचक त्या वनस्पतींबद्दल अधिक माहिती मिळवू शकतात. ‘प्राणी प्रजाती’, ‘अळंबी प्रजाती’ आणि परसबाग वनस्पती या ठिकाणी पह्टोंचा संग्रह केला आहे.
‘अणसुरेविषयी’ या पेजवर गावाची सर्वसाधारण माहिती दिली आहे. रत्नागिरीचे भूगोलाचे अभ्यासक श्रीवल्लभ साठे यांनी गावाचा एक पद्धतशीर नकाशा तयार करून दिला. गुगल मॅप्सवर दाखवलेला गावाचा नकाशा चुकीचा आहे. वेबसाइटवर प्रकाशित केलेला नकाशा हा ‘गुगल अर्थ प्रो’, ‘क्यूजीआयएस’ अशी सॉफ्टवेअर्स वापरून तयार केलेला आहे. यामध्ये गावातले मुख्य रस्ते, जलप्रवाह, शेती क्षेत्र, कांदळवन पट्टा, सडय़ांचं क्षेत्र, खाडी क्षेत्र अशी सगळी भूरूपं वेगवेगळय़ा रंगांनी दाखवलेली आहेत. गावात शेतमळय़ांचं क्षेत्र किती आहे ते गावाच्या एकूण किती टक्के आहे असे अभ्यास या नकाशावरून करता येतात.
या वेबसाइटवरचा सगळय़ात महत्त्वाचा भाग म्हणजे ‘विशेष नोंदी’. या भागाचं डिझाइन ग्रामभगिनी स्वप्नाली देसाई हिने उत्तम प्रकारे करून दिले. यामुळे ‘आखेऱयातला गिमवस’, ‘कुसुंबाची राई’, गावातील पारंपरिक पाणवठे, गावाची पर्जन्यदैनंदिनी, वाकीचा वहाळ अशा गावातल्या काही वैशिष्टय़पूर्ण गोष्टींची माहिती या विशेष नोंदींमध्ये दिली आहे. अशा प्रकारे हे लोकजैवविविधता संकेतस्थळ माहितीने समृद्ध होतंय आणि यापुढे होत राहील. ज्यांना आपल्या गावात हे काम सुरू करायचंय त्यांना ही वेबसाइट एक संदर्भ म्हणून नक्की उपयोगी पडेल. अणसुरे ग्रामपंचायतीने केलेला हा प्रयोग सर्वांसाठी निश्चितपणे मार्गदर्शक ठरेल.
असे आहे संकेतस्थळ
गुगलवर www.ansuedrebmced.in असं सर्च केल्यानंतर ही वेबसाइट ओपन होते. अणसुरे गावाच्या पश्चिम टोकाला एक पीर आहे आणि पूर्व टोकाला एक दुर्गादेवीचं देवस्थान आहे. ही गावाची पारंपरिक सांस्कृतिक आणि भौगोलिक हद्द असल्यामुळे वेबसाइटचं शीर्षक ‘दर्यापीरापासून दुर्गादेवीपर्यंत’ असं ठेवलंय. मुखपृष्ठावर गावाच्या जैवविविधतेचे 12 प्रकार दिसतात. यापैकी कुठल्याही प्रकारावर क्लिक केल्यावर त्या प्रकारातल्या प्रजातींचे पह्टो आणि नावांसहित यादी ओपन होते. यापैकी कुठल्याही प्रजातीवर क्लिक केल्यावर त्या प्रजातीची थोडक्यात माहिती असणारं पान उघडतं. ही सगळी माहिती ही ‘स्थानिक’ आहे. यामध्ये त्या प्रजातीचा लोकजीवनाशी कसा संबंध आहे हे प्राधान्याने दिलेलं आहे.






























































