
पंजाब नॅशनल बँकने तटरक्षक दलातील जवानांसाठी पीएनबी रक्षक प्लस ही अपघात विमा योजना आणली आहे. त्यासाठी हिंदुस्थानी तटरक्षक दलाशी सामंजस्य करार केला आहे. पीएनबी रक्षक प्लसमुळे हिंदुस्थानी तटरक्षक दलातील जवानांना वैयक्तिक अपघात विमा, संपूर्ण अपंगत्व विमा, सेवारत, सेवानिवृत्त आणि प्रशिक्षणार्थी तसेच सशस्त्र दल, केंद्रीय पोलीस सशस्त्र दल आणि पोलीस दलात सेवा करणारे निवृत्तीवेतनधारक, संरक्षण कर्मचारी यांच्या विम्याचा समावेश आहे. करारावर तटरक्षक दलाचे उपमहानिरीक्षक काजल राय आणि महाव्यवस्थापक राजीव कुमार यांनी स्वाक्षरी केली.
























































