औसा तालुक्यातील नांदुर्गा भाग दोन लगत असलेल्या सामाजिक वनविभाग फॉरेस्ट परिसरात दोन काळविटाची टक्कर लागून दोन्हीही काळवीटाचा जागीच मृत्यू झाला आहे.
ही घटना घडल्यानंतर ताबडतोब संबंधित विभागाला कळविण्यात आले होते. त्यानंतर पशुधन विकास अधिकारी जोगे यांनी घटनेची पाहणी करून दोन्हीही काळविटांचे जागेवरच शवविच्छेदन केले. दोन्ही काळविटांचे मृतदेह वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले आहे. नांदुर्गा व परिसर तेरणा नदीपट्ट्यात असल्याने येथे हरिण मोठ्या संख्येने आहेत. परंतु, महिन्यात किमान दोन ते तीन वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने हरीण, काळवीट मरण्याच्या संख्येत वाढ झाली असून संबंधित विभागाने यावर उपाययोजना करावी, अशी मागणी नांदुर्गा व परिसरातील प्राणी मित्रांनी केली आहे.

























































