आरोग्य – आयव्हीएफ सायकल का अयशस्वी होते?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयव्हीएफ सायकल हे शंभर टक्के यशस्वी होतेच असे नाही. हे जरी माहीत असले तरीदेखील या अपयशाचा सामना करणे एका जोडप्यासाठी अवघड ठरते. आयव्हीएफ यशस्वी न होण्यामागची कारणे कोणती याविषयी सविस्तर माहिती.

गर्भाची गुणवत्ता ः आयव्हीएफ उपचारादरम्यान प्रयोगशाळेत गर्भाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने स्त्र्ााrबीजे आणि पुरुषाचे शुक्राणू एकत्र मिसळले जातात. त्यातून निर्माण झालेले भ्रूण प्रयोगशाळेत निरोगी दिसू शकते, परंतु प्रत्यक्षात गर्भाशयात रोपण केल्यावर अदृश्य दोषामुळे ते अयशस्वी होण्याची शक्यता असते. हाच त्यांच्या गुणसूत्र जोडण्यातला एक दोष आहे. क्रोमोसोमल विकृती किंवा बिघाड असलेल्या भ्रूणांमुळे आयव्हीएफ अयशस्वी होऊ शकते. याचा अर्थ गर्भामध्ये क्रोमोसोमल डीएनए गहाळ होणे किंवा अतिरिक्त किंवा अनियमित डीएनए यांचा समावेश असणे. असे गर्भ शरीराकडून नाकारले जातात आणि त्यामुळे आयव्हीएफ अपयशी ठरते. वारंवार अपयशाच्या काही प्रकरणांमध्ये ‘पीजीटी-ए’ नावाची चाचणी घेण्याचा सल्ला दिला जातो. जेथे भ्रूणांची गुणसूत्रातील विकृतींसाठी चाचणी केली जाते.

एआरटी म्हणजे काय?

असिस्टेड रिप्रॉडक्टिव्ह टेक्नॉलॉजीमध्ये (एआरटी) वंध्यत्वावर उपचार करण्यासाठी आणि गर्भवती होण्यासाठी वापरल्या जाणाऱया प्रक्रियांचा समावेश होतो. आययूआय, इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन (IVF) आणि इंट्रासायक्लोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) हे काही सामान्य एआरटी उपचार आहेत, जे वंध्यत्वाचा सामना करणाऱया जोडप्यांना पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी दिले जातात. आजकाल बहुसंख्य जोडपी, ज्यांना गर्भधारणेसाठी मदतीची आवश्यकता आहे, ती वाढत्या लोकप्रियतेप्रमाणे तसेच सकारात्मक परिणाम देणाऱया विविध एआरटी उपचारांची निवड करतात.

इन-व्हिट्रो फर्टिलायझेशन बाळाच्या आईपुरते मर्यादित नाहीत. ते सरोगसी किंवा गर्भधारणा वाहकांद्वारेदेखील वापरले जाऊ शकतात. ज्यामुळे अनेक जोडपी त्यांच्या पालकत्वाचे स्वप्न पूर्ण करू शकतात. यामध्ये अविवाहित महिला, शारीरिकदृष्टय़ा पूर्ण मुदतीचे बाळ जन्माला घालण्यास असमर्थ असलेल्या स्त्र्ाया किंवा अविवाहित महिलांचा समावेश आहे. डोनेट केलेली अंडी किंवा शुक्राणू वापरू शकतात. काही वेळा प्रजनन तज्ञ डोनेट केलेली अंडी किंवा शुक्राणू वापरण्याची शिफारस करतात. या प्रकरणांमध्ये अंडय़ाला प्रयोगशाळेत फलित केले जाऊ शकते आणि परिणामी त्यातून फलित झालेले भ्रूण आयव्हीएफसाठी वापरले जाऊ शकते. ज्यामुळे महिलांची प्रथम किंवा दुसऱयांदा गर्भवती होण्याची शक्यता वाढते. जे रुग्ण त्यांच्या करीअरवर लक्ष पेंद्रित करतात किंवा ज्यांच्या जीवनातल्या काही अडचणींमुळे ज्यांना बाळाचा जन्म अमुक एका वयात व्हावा असे वाटते त्यांना आयव्हीएफमुळे अधिक फायदा होतो.

निरोगी बाळ होण्याची शक्यता वाढविण्यासाठी आनुवंशिक तपासणी हे एक शक्तिशाली तंत्रज्ञान आहे, जे आपल्या बाळ निरोगी आहे याची खात्री करण्यास मदत करते. आनुवंशिक स्क्रीनिंगचा वापर करून – ज्याला प्रीइम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (PGT) म्हणतात – तुम्ही आयव्हीएफदरम्यान वापरलेले गर्भ ज्ञात आनुवंशिक मार्करपासून मुक्त असल्याची खात्री करू शकता. सिस्टिक फायब्रोसिस, डाऊन सिंड्रोम, सिकलसेल ऑनिमिया इत्यादी जीवघेण्या वैद्यकीय स्थितींशी याचा संबंध असू शकतो. जर आई किंवा वडिलांनी या आजारांसाठी सकारात्मक चाचणी केली किंवा गंभीर आनुवंशिकसंबंधित आजारांचा काwटुंबिक इतिहास असल्यास गर्भपात होण्याची शक्यता कमी करण्यासही याची मदत होते. गर्भपाताचे सर्वात सामान्य कारण म्हणजे आनुवंशिक विकृती, ज्यामुळे शरीर नैसर्गिकरीत्या गर्भधारणा संपुष्टात आणते. वेळेपूर्वी गर्भाची आनुवंशिक व्यवहार्यता निश्चित करण्यासाठी पीजीटी चाचणीचा वापर करून मातृत्वाचा सुखद अनुभव घेता येतो.

– डॉ. रितू हिंदुजा,
(लेखक नोव्हा आयव्हीएफ फर्टिलिटी, मुंबई येथे वंध्यत्व निवारण तज्ञ आहेत)