
आपला लडिवाळ बाप्पा महाराष्ट्राची वेस ओलांडून कधीचाच सगळ्या देशाचा नव्हे तर जगाचा लाडका झाला आहे. त्याचे गोजिरवाणे.. देखणे रूप प्रत्येकालाच मोहवणारे.. त्याचे प्रत्येक देवस्थान हे जागरूक आणि तितकेच लोकप्रिय.. आपल्या अष्टविनायकाप्रमाणे देशातही गणेशाची १० मंदिरे आहेत.

१) कनीपकम मंदिर, आंध्र प्रदेश – आंध्र प्रदेशातील चित्तोड जिल्ह्यात तिरुपती देवापासून ७५ किमी दूर वसलेले कनीपकम हे प्राचीन गणेश मंदिर त्याची ऐतिहासिक वस्तू आणि आकर्षक बांधणीसाठी प्रसिद्ध आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी सर्वच भाविक वर्षभर गर्दी करतात. या मंदिराचे बांधकाम ११व्या शतकात चोला साम्राज्याच्या चोला पहिला या राजाच्या कारकिर्दीत झाले आहे. विनायकी चतुर्थीच्या निमित्ताने साजरा होणारा ब्राम्होत्सवम हा सोहळा प्रमुख मनाला जातो.

२) मणकुला विनायक मंदिर – पोन्डिचेरी येथील हे गणपती मंदिर १६६६ वर्षांपूर्वी फ्रेंच वसाहतीच्या काळात बांधण्यात आले. मंदिरातील एका लहान तलावावरून या मंदिरास मणकुळा हे नाव देण्यात आले. मंदिराजवळील किनारयावरील वाळू या तलावाजवळ गणेश मूर्तीच्या रुपात साचते. अनेकदा समुद्रात टाकून दिल्यानंतरही तशीच गणेश मूर्ती पुन्हा प्रकटते. मंदिरात एक हत्ती असून त्याच्या सोंडेने आशीर्वाद घेणे शुभ समजले जाते.

३) मधुर महागणपती मंदिर – माधुवाहिनी नदीच्या तटावर स्थित हे मंदिर दहाव्या शतकात बांधण्यात आले. कुम्बळ साम्राज्याच्या मैपदी राजस याने ही बांधणी केली आहे. येथील मूळ दैवत शिवशंकर आहेत. पण विविध धातूंपासून बनवलेली गणेश मूर्ती मुख्य आकर्षण आहे. टिपू सुलतान हे मंदिर नष्ट करण्यासाठी आला होता. मात्र या मंदिरात जाताच त्याचा विचार बदलून तो परत फिरला. मंदिरात तलाव असून त्यातील पाणी औषधी असून त्याने त्वचा रोग, दुर्धर आजार बरे होतात. दरवर्षी मंदिरात मोदप्पा सेवा हा प्रमुख सोहळा पार पडतो. यात बाप्पाच्या मूर्तीला तूप व गोड भाताचे लेपण केले जाते.

४) त्रिनेत्र गणेश मंदिर, रणथंबोर – रणथंबोर राष्ट्रीय उद्यानातील १००० वर्षे जुन्या किल्ल्याच्या माथ्यावर ६५०० वर्ष जुने त्रिनेत्र गणेशाचे मंदिर आहे. कृष्ण रुक्मिणीच्या लग्नाची पत्रिका सर्वप्रथम या मंदिरात देण्यात आली होती असे म्हटले जाते. यामुळे देशभरातून बाप्पाचा आशीर्वाद घेण्यासाठी असंख्य लग्न पत्रिका मंदिरात येतात. दरवर्षी मंदिरात गणेश मेळा भरतो. तेव्हा देशभरातून भाविक येतात.

५) मोटी दुंगरी गणेश मंदिर जयपूर – १८व्य शतकात लहानशा टेकडीवर दगडातून कोरून हे मंदिर उभारले आहे. गणेश चतुर्थीला येथे मोठा सोहळा पार पडतो.

६) गणेश टोक मंदिर गंगटोक – बौद्ध भिक्षूंच्या प्रार्थना स्थळाजवळ असलेले हे मंदिर भाविकांचे प्रथम पूज्य स्थान आहे.

७) उच्ची पिल्लयार मंदिर – चेन्नईतील तिरुचिरापल्ली शहरातील उंच टेकडीवरील हे मंदिर चेन्नईवासियांसाठी खास आहे. गणेशोत्सव खूप मोठ्या प्रमाणावर येथे साजरा केला जातो.

८) सासीव काळू आणि कडाळे काळू गणेश मंदिर हम्पी – हे मंदिर हम्पी येथील पर्यटनाचे मुख्य आकर्षण आहे. १४४० साली साकारलेल्या गणेशाच्या दोन मूर्ती येथे आहेत. गणेशाची मूर्ती कर्नाटक राज्यातील सर्वात मोठी मूर्ती आहे. दक्खनच्या सुलतानाने या गणेश मूर्तीचे पोट फोडले. तेव्हा संपूर्ण मूर्तीला तडा गेला. त्यानंतर चण्याच्या डाळीचे रूप या मूर्तीला प्राप्त झाले.

























































