
एक दोन नव्हे तर तब्बल तीनवेळा एक महिला लैंगिक शोषणाच्या गुन्ह्यात दोषी आढळली आहे. एका टॅक्सी चालकाचे लैंगीक शोषण केल्याने त्याने पोलीस स्थानकात तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने या प्रकरणात तिला दोषी ठरवले असून तिला नुकतीच शिक्षा सुनावण्यात आली. मात्र तिची शिक्षा अद्याप जाहीर झालेली नाही.
आयरीन टोरी (42) असे त्या महिलेचे नाव असून ती स्कॉटलंडच्या डूंडी येथील रहिवासी आहे. आयरीन 2020 साली एका टॅक्सीतून चालली होती. त्यावेळी ती मागच्या सीटवर बसली होती. मात्र जशी टॅक्सी सुरु झाली तशी मध्येच ती महिला टॅक्सी चालकाच्या बाजुच्या सिटवर येऊन बसली आणि टॅक्सी चालकासोबत विचित्र चाळे करु लागली. एवढेच नाही तर त्याच्यासोबत लैंगीकसंबंध ठेवण्यासाठी त्याला पैसेही ऑफर केले. त्यावर त्याने नकार दिल्यावर त्याच्यासोबत ती बळजबरी करायला लागली.
याप्रकरणी टॅक्सी चालकाने तिच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. फिर्यादी लोरा अपोस्टोलोव्हा यांनी न्यायालयाला सांगितले की टोरी मागच्या सीटवर बसली होती. प्रवासादरम्यान तिने चालकाची विचारपूस सुरू केली. आणि अचानक चालकाला तो विवाहीत आहे का? असे विचारले आणि त्यानंतर तो आपल्या पत्नीला फसवू शकतो का? असेही विचारण्यात आले. अपोस्टोलोव्हाने पुढे सांगितले की, त्यानंतर अचानक ती मागच्या सीटवरुन त्याच्या बाजूच्या सीटवर आली. आणि चालकासोबत अश्लील वर्तन सुरु केले होते.
टोरी आधीपासूनच सेक्स ऑफेंडर्सच्या यादीत आहे. तिच्याविरोधात पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई केली होती. 2019 मध्ये टोरीने दारुच्या नशेत एका ट्रेन कंडक्टरसोबत गैरवर्तन केले होते. याआधीही तिच्यावर सेक्श्युअल असॉल्टचे आरोप करण्यात आले होते. दोन वर्षांपूर्वी ट्रेन कंडक्टरचे लैंगिक शोषण केल्यामुळे तीला ट्रेनमधून उतरवले होते. बोलले जाते की त्यावेळी ती नशेत होती.





























































