
ट्विटरकडून हिंदुस्थानातील कायद्यांचे पालन केले जात नसल्याचा आरोप एकीकडे पेंद्र सरकारने कर्नाटक उच्च न्यायालयात केला आहे. याचदरम्यान ट्विटरने महिनाभरात 45 हजारहून अधिक हिंदुस्थानींचे ट्विटर अकाऊंट बंद केल्याची माहिती उजेडात आली आहे. जुलैमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून 45,191 हिंदुस्थानी युजर्सच्या ट्विटर अकाऊंटसवर बंदी घातली आहे. पंपनीकडे देशभरातील युजर्सकडून 874 तक्रारी आल्या होत्या. ट्विटरने केलेल्या या कारवाईमुळे संबंधित अकाऊंटधारकांची मोठी गैरसोय होत आहे.




























































