मांडओहोळ प्रकल्प ओव्हरफ्लो; पारनेर तालुक्यातील शेती, पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बुधवारी रात्री झालेल्या दमदार पावसामुळे पारनेर तालुक्याला वरदान ठरलेल्या मांडओहोळ मध्यम प्रकल्पात शुक्रवारी 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे मांडओहोळ धरण ओव्हरफ्लो झाल्याची माहिती उपविभागीय अभियंता व्ही. टी. शिंदे व मांडओहोळ मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता अभिजित मोरे यांनी दिली.

मांडओहोळ धरण भरल्याने शेतकरीवर्गासह पारनेरवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गणेशोत्सवकाळात धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने पर्यटकांमध्ये उत्साह संचारला आहे. धरण भरल्याने संपूर्ण पारनेर तालुक्याची तहान भागणार असल्याचे उपविभागीय अभियंता शिंदे व मांडओहोळ मध्यम प्रकल्पाचे शाखा अभियंता मोरे यांनी सांगितले.

मांडओहोळ मध्यम प्रकल्पाची एकूण साठवणक्षमता 399 दशलक्ष घनफूट, तर उपयुक्त साठा 310 दशलक्ष घनफूट आहे. या वर्षी पळसपूर, नांदुर पठार, सावरगाव, कर्जुले हर्या परिसरासह लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरण भरले आहे. याअगोदर 2019, 2020 व 2021 सालीदेखील मांडओहोळ धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. मांडओहोळ मध्यम प्रकल्पाची एकूण साठवणक्षमता 399 दशलक्ष घनफूट, तर उपयुक्त साठा 310 दशलक्ष घनफूट आहे. या वर्षी पळसपूर, नांदुर पठार, सावरगाव, कर्जुले हर्या परिसरासह लाभक्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे धरण भरले आहे.

पर्यटकांसाठी पर्वणी

मांडओहोळ धरणामुळे पारनेर तालुक्यातील शेतीच्या पाण्यासोबत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटणार आहे. तसेच हे धरण भरल्यामुळे नगर आणि पुणे जिह्यांतील पर्यटकांसाठी ही पर्वणीच ठरणार आहे. धरण भरल्यामुळे मोठय़ा प्रमाणात या ठिकाणी पर्यटक गर्दी करीत आहेत.