
एकीकडे अतिवृष्टीमुळे शेतीचे नुकसान झालेले असताना नवनिर्वाचित मंत्री आपल्या वैयक्तिक कामात व्यस्त आहेत. असे म्हणत शेतकऱयांनी बंदरे व खणीकर्म मंत्री दादा भुसे यांच्या कार्यक्रमात राडा केला. विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी दादा भुसे धुळे जिह्यातील साक्रीमधील कासारे गावात आले होते यावेळी आक्रमक झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱयांनी ’पन्नास खोके मंत्री ओके’च्या जोरदार घोषणा देत काळे झेंडे दाखवत परिसर दणाणून सोडला. यावेळी पोलीसांनी मध्यस्थी करत शेतकऱयांना समज दिली.
राज्यासह धुळे जिह्यात मोठय़ा प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱयांच्या पिकांचे नुकसान झाले असून त्याची पाहणी करण्यासाठी सरकारला वेळ नाही, मात्र उद्घाटनाचे कार्यक्रम घेण्यास वेळ आहे. शेतकरी अडचणीत सापडलेला असताना नवनिर्वाचित मंत्र्यांना त्याच्या प्रश्नासंदर्भात काही देणे घेणे नाही, असा आरोप यावेळी शेतकऱयांनी केला. आपल्या पहिल्याच दौऱयादरम्यान बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे यांना शेतकऱयांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. कांद्याला भाव मिळत नाही, साक्री तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर होत नाही. यामुळे आक्रमक झालेल्या शेतकऱयांनी हे आंदोलन केले.
शेतकऱयांनी झिडकारले
विकास कामांच्या उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू असतानाच शेतकरी अधिक आक्रमक झाले. यावेळी आंदोलक शेतकऱयांनी ’50 खोके… मंत्री एकदम ओके’ अशा जोरदार घोषणाही दिल्या. यावेळी दादा भुसे यांनी शेतकऱयांची समजूत काढून शांत राहण्याचे आवाहन केले. मात्र आक्रमक झालेले शेतकरी दादा भुसे यांचे ऐकून घेण्याच्या मानसिकतेत नव्हते. अखेर पोलिसांनी शेतकऱयांना समज देऊन बाजूला हटवण्याचा प्रयत्न केला.






























































