
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी महिलांवरील अत्याचारावर वादग्रस्त विधान केलं आहे. दुमका येथे झालेल्या सलग दोन घटनांवर त्यांनी भाष्य केलं आहे.
दुमका येथे सलग दोन घटनांमध्ये महिलांचा मृत्यू झाला होता. पहिल्या घटनेत एका तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीला जिवंत जाळलं होतं. तर दुसरीकडे शनिवारी एका अल्पवयीन मुलीचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळून आला होता. या दोन्ही प्रकरणातील आरोपींना अटक झाली आहे.
या प्रकरणी रविवारी हेमंत सोरेन यांना माध्यमांनी प्रश्न विचारला होता. त्याला उत्तर देताना ते म्हणाले की, अशा घटना कुणाला सांगून होत नाहीत. त्या घडतात आणि कुठे घडत नाहीत, तुम्हीच सांगा, असं विधान सोरेन यांनी केलं आहे.
सोरेन यांच्या या विधानानंतर संतापाचं वातावरण असून सोरेन यांच्या बेजबाबदार वक्तव्याचा निषेध केला जात आहे.




























































