मिसकॉलने खंडित विजेची तक्रार नोंदवा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील वीज ग्राहकांना आता आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस कॉल देऊन वीजपुरवठा खंडित असल्याची तक्रार करता येणार आहे. त्यासाठी महावितरणने 022-50897100 हा क्रमांक जारी केला आहे.

महावितरणकडून राज्यभरात वीजपुरवठा केला जात असून दररोज कुठे ना कुठे वीजपुरवठा खंडित असतोच. ग्राहकांना त्यांची तक्रार घरी बसून करता यावी म्हणून महावितरणने मिस कॉलची सेवा सुरू केली आहे. ज्या मोबाईल क्रमांकावरून तक्रार केली जात आहे तो क्रमांक महावितरणकडे नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे.

दरम्यान, महावितरणचा टोल फ्री क्रमांक बदलला असून ग्राहकांनी आता 1800-212-3435 या नवीन क्रमांकावर संपर्क करावा, असेही स्पष्ट केले आहे.