Video – नागाने कोंबडीचे अंडे गिळले अन सर्पमित्राला बघून ओकले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ग्रामीण भागात गोठ्यात, अंगणात कोंबडीसाठी शिकारा ठेवला जातो. या शिकाऱ्यात कोंबडीचे अंडे असतात. या अंड्यांना कोंबडी उब देत असते. अश्या एका शिकाऱ्यावर नागाची नजर पडली. शिकाऱ्यातील अंडे खायला नागाने शिकारा गाठला. दोन, तीन अंडी नागाने गिळली. मात्र शिकाऱ्यात नाग बघताच कोंबडी ओरडायला लागली.

कोंबडीचे ओरडणे बघून घरमालकाने शिकाऱ्यात डोकावून बघितले. तेथील दृश्य बघून त्यांचा अंगावर काटाच उभा राहिला. शिकाऱ्यात नाग कोंबडीचे अंडे गिळत होता. हा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या गोंडपिपरी तालुक्यातील डोंगरगाव येथील रहीवासी राजू लखमापुरे यांच्या घरी घडला.

त्यांनी सर्पमित्र दीपक वांढरे यांना भ्रमणध्वनीने याची माहिती दिली. वांढरे यांनी डोंगरगाव गाठले. मोठ्या शिताफीने नागाला शिकाऱ्यातून बाहेर काढले. नागाला पकडत असतांना नागाने गिळलेले दोन कोंबडीचे अंडे बाहेर ओकले. त्यानंतर नागाला जेरबंद करून त्याला मुक्त अधिवासात सोडण्यात आले. मात्र तो अंडे ओकतानाचा क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

पाहा व्हिडीओ –