
दररोज थोडावेळ बसून दीर्घ श्वसन केल्याने जीवनशैलीत खूप सुधारणा होते. जेव्हा आपण चिंतेत असतो, तणावग्रस्त असतो तेव्हा आपल्या हृदयाची धडधड सतत वाढत असते. हे टाळण्यासाठी दीर्घ श्वसनाचा सतत सराव करा. यामुळे मानसिकआराम मिळून झोपही चांगली येते.
1) शरीरातील विषारी घटक कमी होतात – सावकाश, सखोल श्वास घेतल्याने मन शांत होते. दीर्घ श्वासाने शरीरातील कार्बन डाय ओक्साइड बाहेर पडण्यास मदत होते.
2) दीर्घ श्वासाने हवेतील प्राणवायू मिळतो. शरीराचे महत्वाचे अवयव नीट काम करू लागतात. निरोगी रक्तपुरवठ्याने संसर्ग पसरवणारे जंतू मुलापासून नष्ट होतात.दीर्घ श्वसनाने चयापचय क्रिया सुधारते. कोर्टीसोलची पातळी कमी होते. हार्मोन्स संतुलित होतात. हे ताण वाढविणारे हार्मोन आहे. याची पातळी जास्त काळ वाढलेली चंगली नसते.रक्तप्रवाह सुरळीत होतो. फुफुसाना व्यायाम होत असल्याने राक्त्प्रवाहाची गती वाढते.


























































