गोकुळ’कडून गाईच्या दूध खरेदी दरात महिन्यात दुसऱयांदा वाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)ने गाय दूध उत्पादक शेतकऱयांसाठी एक महिन्यात दुसऱयांदा खरेदीदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. एक रुपयाची वाढ करण्यात आली असून, या निर्णयाची अंमलबजावणी येत्या 11 सप्टेंबरपासून होणार आहे. आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत दरवाढीवर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती ‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली. या निर्णयानुसार गाय दूधखरेदी दर 3.5 फॅट व 8.5 एसएनएफ प्रतीच्या दुधास प्रतिलिटर 32 रुपये असा दर राहणार आहे. गोकुळ दूध संघाकडून 1 मार्च 2022 पासून आतापर्यंत गाय दूध खरेदी दरात सरासरी प्रतिलिटर 5 रुपये वाढ करण्या त आली आहे.