
शिवसेना नेते व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज धारावीचा झंझावाती दौरा करीत धारावीतील तमाम गणेशोत्सव मंडळांच्या सार्वजनिक गणेशोत्सवांना भेटी देत गणरायाचे दर्शन घेतले. यावेळी गणेशोत्सव मंडळांनी ठिकठिकाणी शाल, श्रीफळ देऊन व फेटे घालून आदित्य ठाकरे यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी विभागप्रमुख महेश सावंत, महिला आघाडी विभागप्रमुख श्रद्धाताई जाधव, माजी आमदार व दक्षिण मध्य मुंबई लोकसभेचे निरीक्षक बाबूराव माने, धारावी विधानसभेचे विभागप्रमुख मनोहर रायबागे, धारावी संघटक विठ्ठल पवार, प्रकाश आचरेकर या प्रमुख पदाधिकाऱयांसह हजारो शिवसैनिक व गणेशभक्त यावेळी उपस्थित होते.
अखिल भारतीय पुंचिकोरवे समाज उन्नती मंडळाच्यावतीने आदित्य ठाकरे यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राजू पुंचिकोरवे, सचिव गंगा देरबेर, हेमंत मादगुंडे आदी उपस्थित होते.



























































