पापुआच्या न्यू गिनीमध्ये 7.7 तीव्रतेचा भूकंप; मोठी हानी झाल्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पापुआतील न्यू गिनीमध्ये रविवारी सकाळी भूकंपाचे तीव्र झटके जाणवले. रिश्कर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 7.7 एवढी नोंदवण्यात आली आहे. या भूंकपामुळे लोक घराबाहेर आली आणि घबरा पसरली. या तीव्र भूकंपामुळे मोठी हानी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भूंकपाचा केंद्रबिंदू कॅनंटू शहराजवळ 61 किलोमीटर खोलीवर होता. या भूकंपामुळे मदांग शहरातील अनेक इमारतींचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. या भूंकपामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला होता. मात्र, आता हा धोका टळल्याचे यूएसजीएसने सांगितले. पापुआ गिनीसह इंडोनेशियातही भूकंपाचे धक्के जाणवले. इंडोनेशियातील सुमात्रा बेटांवर हे धक्के जाणवले. रिश्कर स्केलवर त्याची तीव्रता 6.0 नोंदवण्यात आली. जमीनीतल भूस्तरातील हालचालींमुळे भूकंप येत असल्याचे संशोधकांनी सांगितले.