Video – संभाजीनगरात प्रवाश्यांनी भरलेली सिटी बस पेटली, वरुड फाटा येथील घटना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

करमाड येथून संभाजीनगरच्या मध्यवर्ती बस स्थानकाकडे निघालेली स्मार्ट सिटी बस रविवारी अचानक पेटली. ही बाब चालकाच्या वेळीच लक्षात आल्याने त्याने बस थांबून सर्व प्रवाशांना खाली उतरविले. त्यामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही, मात्र या घटनेत संपूर्ण बस जळून खाक झाली. ही घटना वरुड फाटा येथे दुपारी 12 वाजून 30 मिनिटांनी घडली. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

महापालिकेच्या वतीने शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने शंभर सिटी बस खरेदी करण्यात आल्या आहेत. शहरासह विविध मार्गावर या बसेस धावतात. रविवारी करमाड येथून संभाजीनगरला येणारी सिटी बस अचानक पेटली. धावत्या सिटी बसला आग लागल्याचे कळताच चालकाने बस थांबवून प्रवाशांना उतरविले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamanaonline)

बसमध्ये साधारणपणे दहा ते पंधरा प्रवासी होते. त्यानंतर आगरोधक यंत्राद्वारे आग विझविण्याचा चालकाने प्रयत्न केला. आग आटोक्यात आली नाही. तातडीने अग्निशमनचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाने पाण्याचा मारा करत बसला लागलेली आग विझवली. मात्र आगीत बस जळून खाक झाली.