
दहशतवादाने पिचलेल्या कश्मिरींना सुमारे 30 वर्षांनी पुन्हा चित्रपटांची जादू अनुभवायला मिळाली आहे. जम्मू-कश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या हस्ते आज पुलवामा आणि शोपिया या दोन जिह्यांमध्ये मल्टीपर्पज सिनेमा थिएटर्सचे उद्घाटन केले. जम्मू-कश्मीरच्या प्रत्येक जिह्यात आधुनिक थिएटर्स सुरू करू, यात तीन 520 आसनक्षमता असलेली थिएटर्स असतील, अशी घोषणा सिन्हा यांनी केली. कश्मीरमध्ये 1980 च्या दशकात कश्मीर घाटीत 12 सिंगल स्क्रिन थिएटर्स होते. 1990 यातील काही बंद असलेली थिएटर्स पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न झाला. चित्रपट आणि संगीताला विरोध करत दहशतवाद्यांनी सक्तीने अनेक थिएटर्स बंद पाडले. काही जाळले तर काहींमध्ये बॉम्बस्पह्ट घडवून बंद पाडले.




























































