रामदास कदम यांना वेडय़ांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा! शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी फोडून काढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करणाऱ्या रामदास कदम यांना शिवसेना नेते, आमदार भास्कर जाधव यांनी आज चांगलेच फोडून काढले. ‘‘रामदास कदम यांना तातडीने वेडय़ांच्या हॉस्पिटलमध्ये पाठवा अन्यथा तो माणूस काही ना काही अघटीत घडवेल,’’ असे आमदार जाधव म्हणाले.

दापोलीतील सभेत कदम यांनी केलेल्या बडबडीला भास्कर जाधव यांनी आज प्रत्युत्तर दिले. ‘‘मुंबईतील शौचालयांमधून जेवढी घाण बाहेर पडत नाही तितकी कदम यांच्या तोंडून बाहेर पडली,’’ असे जाधव म्हणाले. ‘‘भास्कर जाधव माझ्या पाया पडले होते,’’ असे विधानही कदम यांनी केले होते. त्यावर बोलताना जाधव म्हणाले की, ‘‘माझे वडील वारल्यानंतर कदम हे सांत्वन करण्यासाठी माझ्या घरी आले होते तेव्हा मी त्यांच्या पाया पडलो होतो.’’

बायका जोडय़ाने मारतील

‘‘रामदास कदम यांनी वापरलेली भाषा आजतागायत कुणीही वापरली नव्हती. त्यांच्या भाषेचा विषय महाराष्ट्रात पसरेल तेव्हा राज्यातील जनता आणि विशेषकरून बायका कदमांची जोडय़ाने पूजा करतील,’’ असे भास्कर जाधव म्हणाले.