अग्रवाल पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर फॉक्सकॉनचे ग्रह बदलले, रोहित पवार यांचा गौप्यस्फोट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वेदांत-फॉक्सकॉनच्या महाराष्ट्रातील गुंतवणुकीबाबत महाविकास आघाडीच्या काळात सगळय़ा गोष्टी अंतिम झाल्या होत्या. टॅक्स बेनिफिट, जागेची किंमत आणि इतर सर्व गोष्टी अंतिम झालेल्या असताना सरकार बदललं. कदाचित या सरकारनेदेखील प्रयत्न केलेले असावेत, पण 5 सप्टेंबर रोजी जेव्हा अग्रवाल हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले आणि त्यानंतर ग्रह बदलाप्रमाणे सर्वच गोष्टी बदलायला सुरुवात झाली, असा गौप्यस्पह्ट राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे.

फॉक्सकॉन प्रोजेक्टमधून महाराष्ट्रामधील दीड लाख युवकांना नोकरी मिळाली असती; परंतु हा प्रोजेक्ट गुजरातला गेला. महाराष्ट्रात तळेगावला जागा निश्चित झाली होती, परंतु आता गुजरातमध्ये ते जागा शोधत आहेत. म्हणजे इथे ताट वाढलं होतं आणि गुजरातमध्ये आता त्यांनी जेवण तयार करण्याची सुरुवात केली आहे, लाकडं गोळा करत आहेत, अशी टीका रोहित पवार यांनी केली.

प्रकल्प पुन्हा महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करावेत

गुजरातमध्ये जर त्यांना जमीन अद्याप मिळालेली नसेल आणि असे दोन-तीन प्रोजेक्ट गुजरातमध्ये आले होते; परंतु ज्या जमिनी आता फॉक्सकॉनला दिल्या गेल्या त्या जमिनी त्यांना देऊ केल्या होत्या, परंतु त्यांनी ती जागा घेतली नाही व ते प्रोजेक्ट आता गुजरातला राहिले नाहीत. त्यामुळे फॉक्सकॉनचं जर अद्याप गुजरातमध्ये काही निश्चित झालेलं नसेल, तर तो संपूर्ण प्रोजेक्ट महाराष्ट्रात कसा येईल यासाठी आताच्या सरकारमधील नेत्यांनी प्रयत्न करावेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करून राज्यातील युवकांना नोकरी मिळणार नाही. त्यामुळे डबल इंजिनचा प्रचार करणाऱया राज्य सरकारने हा उद्योग महाराष्ट्रातच झाला पाहिजे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रह धरावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.

दहा वर्षांत महाराष्ट्राचे महत्त्व कमी झाले

आपण जर आकडेवारी बघितली तर असंच दिसून येतं की, मागील दहा वर्षांत महाराष्ट्राचं महत्त्व हे कमी करण्यात आले असेल नाहीतर कदाचित ते आपोआप कमी झाले असेल. या गोष्टी सर्वांनी समजून घेतल्या पाहिजेत. कोणतंही सरकार आलं तरी महाराष्ट्राची ताकद वाढवणं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे न जाणवता तुम्ही जर पेंद्रातील मोठय़ा नेत्यांना बोलू शकत नसाल आणि त्यामुळे महाराष्ट्राचं महत्त्व कमी होत असेल तर कुठंतरी काळजी करण्याची आवश्यकता आहे. महाराष्ट्राच्या भविष्याचा विचार करण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले.

भाजपच शिंदे सरकार पाडेल!

फॉक्सकॉनचा प्रोजेक्ट जर महाराष्ट्रात आला असता तर इतर पंपन्यांनीही प्रोत्साहित होऊन त्यांचे प्रोजेक्ट आपल्या राज्यात आणण्याची इच्छा व्यक्त केली असती; परंतु मुख्यमंत्री दिल्लीश्वरांच्या इच्छेपुढे नमले, अशी टीका राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. भाजप लवकरच शिंदे सरकार पाडेल. हे सरकार कार्यकाळ पूर्ण करणार नाहीच. फक्त एवढाच प्रश्न आहे की सरकार बरखास्त कधी करायचे. भाजपच्या क@ल्क्युलेशननुसार जेव्हा गणिते जुळायला लागतील, तेव्हा भाजपच हे सरकार बरखास्त करेल. त्यादिवशी एकनाथ शिंदेंना आपण किती मोठी चूक केली आहे, हे लक्षात येईल, असे मोठे विधानही त्यांनी केले.